about thumb

 

                                                    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
आमच्या बद्दल ............


राणेज वास्तू व ज्योतिष मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आम्ही गेली १५ वर्षे ज्योतिष आणि वास्तू या क्षेत्राशी संलग्न आहोत. खूप ज्ञान साधना , अभ्यास , आणि कोठे तरी या शाश्त्र च्या माध्यमातून मानवी कल्याण या ध्येयानी प्रेरित होऊन आम्ही आज समाजात उभे आहोत. या दैवी शाश्त्रावरील प्रचंड श्रद्धा आमच्या प्रसिद्धी साठी कारणीभूत झाली आहे. त्या बद्दल त्या वैश्विक ऊर्जेचे मनः पूर्वक आभार !!!!!!!!!!!!!
देवाचे चक्षु म्हणून ज्योतिष शाश्त्राची महती आहे , या शाश्त्राच्या मदतीने समस्त मानव जातीचे कल्याण होत आहे . ह्या मध्ये आमचा खारीचा वाटा आहे .
आम्ही ज्योतिष आणि वास्तू या द्वारे मार्गदर्शन करत आहोत. कुंडली आणि वास्तू ला  योग्य आणि शाश्त्राला अनुसरून मार्गदर्शन केले जाते. पत्रिका बघून उपासना , मंत्र देऊन आपल्या कर्म द्वारे प्रारब्ध बदलण्यासाठी प्रयत्न केले जातात . रत्न धारण करून आपली एनर्जी  वाढते म्हणून योग्य ती रत्ने कुंडलीच्या अनुषंगाने सुचवली जातात , रत्न धारण केल्यामुळे आपल्या जीवनावर मोठे बद्दल होतात . उपासना मंत्र साधना आपल्या मानसिकतेवर परिणाम करून जी गुंतागुंत आपल्या आयुष्यात असते ती सोडवण्याचा प्रयत्न करतो .
त्याच प्रमाणे वास्तू आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असते. त्यामुळे वास्तू मधील दोष आपले जीवन बदलू शकतात . वास्तू तील योग्य स्पंदने जीवन सुखमय करतात म्हणून आम्ही पारंपरिक वास्तू व महावास्तू ( ऍडव्हान्स वास्तू ) द्वारे आपल्या वास्तू चे परीक्षण करून विना तोडफोड उपाय सुचवतो . एनर्जी चा समतोल करतो . रत्न आणि क्रिस्टल थेरपी ( रत्न संस्कार ) द्वारे  दोषांचे निवारण करून आपल्या वास्तूत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतो. 
आम्ही पारंपरिक शाश्त्राला धरून , नियमांना धरून , पूर्णतः विधीवत सर्व उपयोग करून मानवी जीवन सुसह्य  करण्यास आम्ही आपल्याला मदत करत आहोत .
पूर्णतः सचोटी आणि योग्य कार्य प्रणाली मुळे आम्ही आपल्याला योग्य ती मदत ज्योतिष व वास्तू शाश्त्राद्वारे करण्यास बांधील  आहोत. 
राणेज ज्योतिष व वास्तू च्या अलौकिक विश्वात आपले स्वागत आहे . आपले सुखमय जीवन हाच आमचा ध्यास  .......................

}