thumb

परीक्षेसाठी उत्तम उपाय

मंगळवारी ११ जास्वदीं ची फुले आणि ११ दुर्वा जुडी ( प्रत्येक जुडी मध्ये ११ दुर्वा असाव्यात ). 
एका पाटावर ताम्हणात गणपतीची मूर्ती घ्यावी . त्या मूर्ती ची हळद कुंकू , फुले वाहून पूजा करावी. धूप अगरबत्ती दाखवावी. नंतर एक फुल व एक दुर्वा ची जुडी उजव्या हातात घेऊन एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणावे ( अथर्व शीर्ष येत नसल्यास ऐकणे) . स्तोत्र म्हणून झाले कि फुल व जुडी गणपतीच्या पायावर वाहावे. असे ११ वेळा करावे .
नंतर सर्व फुले आणि  दुर्वा जुडी एका लाल कपड्या मध्ये बांधून घ्यावे . रोज रात्री झोपताना ती लाल कपड्याची   पोटली उशी खाली घेऊन झोपावे . सकाळी परत देवघरात ठेऊन देणे. असे परीक्षा संपे पर्यंत करणे . परीक्षा संपल्यावर चांगल्या पाण्या मध्ये विसर्जन करावे.
या उपायाने आपण जो अभ्यास केला आहे तो पूर्णपणे आपल्याला योग्य वेळी आठवतो . उज्ज्वल यश मिळते .
गणपति बाप्पाची आशीर्वाद सदैव पाठीशी राहतात